

Yavatmal News
sakal
यवतमाळ : गोवा तसेच मध्य प्रदेश राज्यात निर्मित देशी-विदेशी मद्याचा साठा यवतमाळ-वर्धा सीमेवर पकडण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (ता. १०) केली. या कारवाईत मद्याचे ६८४ बॉक्ससह तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला यवतमाळ-वर्धा सीमेवरून मद्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.