वीज पडून गुराख्यासह बकरीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lightning strikes

वीज पडून गुराख्यासह बकरीचा मृत्यू

धामणगाव रेल्वे (अमरावती) - तालुक्यातील नागापूर येथील बकरी चारणाऱऱ्या व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला (ता.९) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. त्यात एका बकरीचाही जागीच मृत्यू झाला आहे.वीज पडून मृत्युमुखी होण्याची देवगाव - नागापूर येथील ही पंधरवाड्यातील दुसरी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की,शनिवारला (ता.९) तालुक्यातील नागापूर येथील बाळासाहेब बाबासाहेब दरेकर (५०) हे बकऱ्या चारणाऱ्यासाठी गेले होते.दरम्यान दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला.त्यात बाळासाहेब दरेकर (५०) यांच्यासह एका बकरीच्या अंगावर वीज पडली, यात घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान सायंकाळच्या झाली तरीही बाळासाहेब घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. शोध घेतला असता त्यांचा मृतदेहगट क्र.८८/१ या शेतशिवारात आढळून आला.यावेळी शेजारीच वीज पडून मृत्युमुखी पडलेली एक बकरी व एक कुत्रा सुद्धा आढळून आल्याची माहिती आहे.तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.बाळासाहेब दरेकर यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले आहेत.वीज पडून मृत्युमुखी होण्याची देवगाव - नागापूर येथील ही पंधरवाड्यातील दुसरी घटना आहे.

Web Title: Goat With Goat Herder Death Due To Lightning Amravati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top