ईव्हीएमसाठी तयार होतोय सुसज्ज गोदाम, खर्च तब्बल ९ कोटी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

निवडणुकीच्या काळात मतदानानंतर उमेदवार मतमोजणी केंद्राच्या परिसरात खासगी सुरक्षा यंत्रणा उभी करतात. मतमोजणी नंतरही अनेकदा ईव्हीएमवर आक्षेप घेतले जातात. प्रकरण अनेकदा न्यायालयात जाते. या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची सुरक्षा मोठ्या जोखमीचे काम असते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार याचे बांधकाम होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांतही इव्हीएमसह व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

चंद्रपूर : इव्हीएम मशिन व व्हिव्हीपॅट साठवणुकीसाठी चंद्रपुरात गोदाम बांधण्यात येणार आहे. याकरिता 9 कोटी बत्तीस लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. काल याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. येत्या काही महिन्यांत इव्हीएमच्या साठवणुकीसाठी एक भव्यदिव्य तीनमजली गोदाम चंद्रपरात साकारणार आहे. 

इव्हीएमच्या बाबतीत विरोधकांकडून नेहमीच संभ्रम निर्माण केला जात आहे. निवडणुकीच्या काळात मतदानानंतर उमेदवार मतमोजणी केंद्राच्या परिसरात खासगी सुरक्षा यंत्रणा उभी करतात. मतमोजणी नंतरही अनेकदा ईव्हीएमवर आक्षेप घेतले जातात. प्रकरण अनेकदा न्यायालयात जाते. या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची सुरक्षा मोठ्या जोखमीचे काम असते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार याचे बांधकाम होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांतही इव्हीएमसह व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

शेतात गेलेल्या पत्नीला पती काही दिसले नाही... ते घरी गेल्याचे समजून करीत होत्या काम, मात्र...

साडेनऊ कोटी रुपयाच्या निधीला प्रशासकीय मान्यता
चंद्रपूर जिल्ह्यात इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या साठवणुकीकरिता बांधण्यात येणारे गोदाम हे तीन मजली असणार आहे. या इमारतीकरिता ९ कोटी बत्तीस लाख रुपयाच्या किंमतीचा प्रस्ताव चंद्रपूरच्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. काल याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे गुणवत्तापूर्वक काम करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: godown santioned for EVM