Gondia Deori Bus Accident: Two Dead, 18 Injured
sakal
नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील मुरदोली ते धोबीसराड रस्त्यावर ट्रक-ट्रॅव्हल्सचा (खासगी बस) भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू, तर १५ जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता.४) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. सुनीता हेमलाल बघेले (वय ४५, रा. खैरागड) व मनोज बबलू पटेल (वय ४०, रा. कवर्धा) अशी मृतांची नावे आहे.