Nagpur–Raipur trains running late for 15 days
esakal
गोंदिया : नागपूर ते रायपूर आणि रायपूर ते नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि लोकल रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक गत पंधरा दिवसांपासून कोलमडले आहे. या मार्गावरील सर्वच गाड्या तासन् तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे गोंदिया हे महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. नागपूर ते रायपूरकडे आणि रायपूरकडून गोंदियाकडे धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या गोंदियामार्गे धावतात. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच रेल्वेगाड्या तासन् तास उशिरा धावत आहे. रायपूरकडून गोंदियाच्या दिशेने धावणाऱ्या प्रवासी गाड्यांना गुदमाजवळ थांबवून मालगाड्यांसाठी मार्ग मोकळा करून दिला जात आहे. चार ते पाच मालगाड्या समोर काढल्यानंतर प्रवासी गाड्यांना सोडले जात आहे.