esakal | आनंदवार्ता! एमआरआय खरेदीला मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आनंदवार्ता! एमआरआय खरेदीला मान्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेले एमआरआय यंत्र डिसेंबर 2019 मध्ये कालबाह्य ठरणार आहे. तसे पत्र मेडिकल प्रशासनाला संबंधित कंपनीने दिले होते. ही बाब लक्षात घेत मेडिकलमध्ये नवीन एमआरआय यंत्राच्या खरेदीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. 15 कोटी खर्चून नवीन एमआरआय यंत्र दाखल होणार आहे.
मेडिकलमध्ये 2009 साली खनिकर्म महामंडळासह विविध संस्थांकडून प्राप्त झालेल्या देणगीतून एमआरआय यंत्र लावण्यात आले. विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांतील गरीब रुग्णांसाठी हे यंत्र वरदान ठरले. विशेष असे की, मेयोतील रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी मेडिकलमध्येच रेफर केले जाते. मेयोतील रेडिओलॉजी अभ्यासक्रमाची मान्यताही मेडिकलच्या एमआरआय यंत्रावर अवलंबून आहे. यामुळे काही महिन्यांत मेडिकलसह मेयोतील रुग्णांचा जीव टांगणीला लागला असता. तसेच जुन्या एमआरआय यंत्राची अवस्था अतिशय वाईट असून, तांत्रिक कारणाने वारंवार बंद पडत आहे.
विशेष असे की, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी काही महिन्यांपूर्वी भेट दिली असता हे यंत्र बंद असल्याचे वृत्त दै. "सकाळ'ने उजेडात आणले होते. त्यावेळी डॉ. लहाने यांनी रेडिओलॉजी विभागाला चांगलेच धारेवर धरले होते. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी तत्काळ नवीन एमआरआय यंत्राचा प्रस्ताव सादर केला होता.

loading image
go to top