esakal | शुभ वार्ता! झिलमिली येथे आढळली दुर्मीळ सारस पक्ष्यांची अंडी
sakal

बोलून बातमी शोधा

रावणवाडी : झिलमिली परिसरात आढळलेली सारस पक्ष्याची अंडी.

शुभ वार्ता! झिलमिली येथे आढळली दुर्मीळ सारस पक्ष्यांची अंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रावणवाडी (जि. गोंदिया) : परसवाडा, झिलमिली गावातील निसर्गरम्य वातावरणात दुर्मीळ सारस पक्षी विहार करताना दिसतात. या पक्ष्यांची या परिसरात अंडी आढळून आल्याने पक्षिमित्र व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
परसवाडा, झिलमिली गावातील निसर्गरम्य वातावरण दुर्मीळ सारस पक्ष्यांचे जोडपे हमखास दिसतात. पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनाकरिता शासन कटिबद्ध आहे. गावकरी व पक्षिमित्र नेहमी यासाठी सजग राहतात. परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना सारस जोडपे विहार करताना दिसून आले.
येथील परिसरात पक्ष्यांचे घरटे आहेत. त्यांनी दोन अंडी दिल्याचे सांगितले जाते. अंडीच्या सुरक्षितेसाठी नर-मादी सारस पक्षी घरटी असलेल्या ठिकाणी वावरताना दिसतात. गावात सारस पक्ष्यांनी अंडी दिल्याचे कळताच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सारस पक्षी ऑगस्ट महिन्यात बांधलेल्या घरट्यांत अंडी देतात. अंडी दिल्यानंतर 40 दिवसांनी अंडी उबवतात. त्यांच्या संरक्षणाकरिता पक्षिमित्र वेळोवेळी परिसरात पाहणी करतात.

loading image
go to top