esakal | हिंगणावासींना पुढील महिन्यापासून मेट्रोची सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगणावासींना पुढील महिन्यापासून मेट्रोची सेवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्धा मार्गावरील मेट्रोच्या सेवेमुळे खापरी, एअरपोर्ट साउथ आदी स्टेशनवरून नागरिक प्रवासाचा आनंद लुटत आहेत. पुढील महिन्यापासून हिंगणावासींसह एमआयडीसी परिसरात नोकरीनिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांनाही मेट्रोची प्रवासी सेवा उपलब्ध होणार आहे. या मार्गावरील चार स्टेशनचे काम पूर्ण झाल्याचे मेट्रोचे प्रशासन विभागाचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे यांनी सांगितले.
हिंगणा मार्गावर लोकमान्यनगर, सुभाषनगर रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण झाले असून, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सजवळील स्टेशनचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शनिवारी या स्टेशनच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर अनिल कोकाटे पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंगणा मार्गावर लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनपर्यंत 10 स्टेशन आहेत. यातील चार स्टेशनचे काम 99 टक्के पूर्ण झाले. उर्वरित सहा स्टेशनची कामे महिनाभराच्या अंतराने करण्यात येणार असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले.
इन्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मेट्रो स्टेशन इतर स्टेशनप्रमाणेच अत्याधुनिक यंत्रांनी सुसज्ज आहे. चारही दिशेने हिरवळ असलेल्या या स्टेशनवर बेबी केअर रूम, एटीएमसह इतर सुविधा प्रवाशांना मिळतील. याठिकाणी अत्याधुनिक विद्युत यंत्रणा लावली आहे. यामार्गावर प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर हिंगणा परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्व ते पश्‍चिम असा हा मेट्रो मार्ग आहे. अंबाझरी, गांधीसागर तलावामुळे या मार्गाला ऍक्वालाइन असे नाव दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

loading image
go to top