esakal | आनंदवार्ता! रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी टॅक्‍समध्ये सवलत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आनंदवार्ता! रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी टॅक्‍समध्ये सवलत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी महापालिकेने नव्या बांधकामासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. मात्र, जुन्या इमारतीबाबत प्रश्‍न कायम होता. रेनवॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या जुन्या इमारतधारकाला मालमत्ता करात काही टक्के सवलत देण्यात येणार आहे. जुन्या इमारतमालकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग ऐच्छिक केले आहे.
महापालिकेत झालेल्या स्थापत्य व प्रकल्प समितीच्या बैठकीत सभापती अभय गोटेकर यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत विविध निर्देश प्रशासनाला दिले. नव्या बांधकामासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक असून, याबाबत बांधकाम करणाऱ्याला आर्किटेक्‍टचे प्रमाणपत्र महापालिकेत सादर करावे लागणार आहे. बांधकाम करणाऱ्यांकडून आर्किटेक्‍टच्या प्रमाणपत्राची मागणी करण्याचे निर्देश गोटेकर यांनी दिले. जुन्या इमारतीत जागा कमी असल्याने तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणालीसाठी उपयुक्त जागा नसल्याने त्यांना बांधकाम तोडावे लागणार आहे. ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना ऐच्छिक करण्यात आले. मात्र, जे जुने इमारतमालक रेनवॉटर हार्वेस्टिंग करतील, त्यांना मालमत्ता करात काही टक्‍क्‍यांची सवलत देण्यात येईल, असे गोटेकर यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top