
बुलडाणा : जिल्ह्यात ता. २५ आणि २६ जून रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील आठ मंडळ क्षेत्रामधील ८७ हजार ३९०.२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठ पुराव्याला यश आले असून, सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी ७४ कोटी ४५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. जिल्ह्यातील ९० हजार ३८३ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.