esakal | धान्य विक्रीसाठी आले, सापडले अलगद पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

grain thives

सय्यद जुबेर सय्यद ताहेर (रा. आर्णी), लल्ला उर्फ ललित चव्हाण (रा. दिग्रस) हे दोघे धान्यविक्रीसाठी यवतमाळात आल्याची टीप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.

धान्य विक्रीसाठी आले, सापडले अलगद पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : चोरी केलेले सोयाबीन, तूर, हरभरा धान्य घेऊन विक्रीसाठी यवतमाळातील टांगा चौकात आलेल्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी (ता. २४) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. चोरट्यांकडून तब्बल २४ गुन्हे उघडकीस आलेत.

सय्यद जुबेर सय्यद ताहेर (रा. आर्णी), लल्ला उर्फ ललित चव्हाण (रा. दिग्रस) हे दोघे धान्यविक्रीसाठी यवतमाळात आल्याची टीप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर विश्‍वासात घेऊन विचारपूस केली. सय्यद मुबारक सय्यद मुजफ्फर (रा. दारव्हा), शेख समीर शेख रहीम यांच्यासह मिळून आर्णी, दिग्रस, दारव्हा, पारवा, लाडखेड परिसरात किराणा दुकान, गोदाम फोडले. त्यातून अन्नधान्य, किराणा साहित्यांची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. 

`गृहमंत्र्यांचा फोन आहे, तत्काळ भेटायचे आहे`, कार्यकर्त्यांची पोपटपंची; गर्दी राहिली ताटकळत  
 

सय्यद मुबारक, शेख समीर यांना दारव्हा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आर्णी येथील १२, दिग्रस येथील पाच, दारव्हा येथील चार, पारवा येथील दोन लाडखेड येथील एक असे एकूण २४ गुन्हे उघडकीस आणलेत. चोरट्यांकडून पाच लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अनाथ चिमुकल्याला कवेत घेताना पाणावले उपविभागीय अधिकाऱ्यांचे डोळे!
 

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार, विशाल भगत, सुरेंद्र वाकोडे, मो. जुनेद, सुधीर पिदूरकर, यशवंत जाधव आदींच्या पथकाने केली.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

loading image
go to top