
-अविनाश साबापुरे
यवतमाळ : आजूबाजूला समस्या दिसतात, त्या सोडविण्याचे उपायही सूचतात... पण करणार काय? आमचे कोण ऐकणार? असा गुंता तरुणांच्या मनात नेहमीच असतो. पण आता ही कोंडी फुटणार आहे. कोट्यवधी तरुणांच्या मनातील ‘आयडिया’ एकाच मंचावर गोळा करुन त्यातील दर्जेदार कल्पनांवर अंमलबजावणी होणार आहे. अन् या सोहळ्याचे नाव आहे ‘इन्स्पायर अवार्ड’!