अनोखा पायंडा; हुंड्याऐवजी नवरदेवाने वधुपक्षाकडे केली दोन गायींची मागणी!

chimur
chimur

 चिमूर (जि. चंद्रपूर) : विवाहामध्ये वरपक्षा कडून लाखो रुपयाची रोख ,सोने,दुचाकी , चारचाकी ,फ्लॅट इत्यादींची मागणी मुलीच्या वडिलांकडे केली जाते.मात्र चिमूर तालुक्यातील राष्ट्रसंताच्या तपोभुमीत असलेल्या गोशाळेतील गोसेवक प्रविण दडमल याने लग्नाच्या बोलणीत हुंड्याला तिलांजली देत मुली सोबत दोन गायींची मागणी करीत नवा पायंडा घातला आहे. मंगळवारी  झालेल्या लग्नात वधु पित्यानी वराची मागणी पूर्ण केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी असलेल्या आणि सर्व गुरुदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गोंदेडा चिमूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गोशाळा  आहे. या गोशाळेत गोंदेळा येथील राष्ट्रसंताच्या विचाराने प्रभावित गुरूदेव भक्त प्रवीण दडमल हा  गोसेवक म्हणून कार्यरत आहे. तरुण प्रवीणच्या लग्नाकरीता  स्थळ शोधणे सुरू झाले. प्रविणचे लग्न   डोंगरगावातील राजेंद्र राणे यांची मुलगी आचल हिच्याशी ठरले. लग्नासंदर्भातील बैठकीत मुलगी  मांसाहार करणार नाही, असे सांगण्यात आले. आणि वराकडील मंडळींनी सोने नाणे,रोख ,गाडी अशी हुंड्याची मागणी न करता चक्क मुली सोबत गायी दान करण्याची अट घातली.

सविस्तर वाचा - सामूहिक चाचणीचा निर्णय राज्याने घ्यावा
आचलकडील मंडळींनी ही अट मान्य केली. गायीचे दान मागून प्रवीणने नवीन पायंडा सुरू केला. गोसेवा करण्याचा दृढ निश्चय प्रवीण व आचलने विवाहप्रसंगी केला. हा अनोखा विवाह डोंगरगाव येथे दि 26 मे रोजी सोशल डिस्टन्स ठेऊन मोजक्या पाहुण्यात  पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com