अमरावतीत कशाच्या वसुलीत झाली घट आणि कशामुळे? वाचा...

कृष्णा लोखंडे
Wednesday, 5 August 2020

कोरोना संक्रमणाचा फटका अर्थव्यवस्थेला फसला आहे. उद्योगधंदे, व्यापार अजून रुळावर आला नसल्याने व्यापारी, उद्योजक त्रस्त आहेत. त्यामुळे जीएसटी कशी जमा करावी हा प्रश्न त्यांना पडला आहे.

अमरावती : कोरोना संक्रमणाचा फटका अर्थव्यवस्थेला फसला आहे. उद्योगधंदे, व्यापार अजून रुळावर आला नसल्याने व्यापारी, उद्योजक त्रस्त आहेत. त्यामुळे जीएसटी कशी जमा करावी हा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळेच जीएसटी वसुलीत चांगलीच घट झाली आहे.

जीएसटी मासिक वसुलीवर पडला असून तुलनात्मकदृष्ट्या 43 टक्के करवसुली कमी झाली असल्याची माहिती जीएसटी कार्यालयाने दिली आहे. मार्च ते मे या महिन्यांच्या तुलनेत जून व जुलैची स्थिती त्यातुलनेत मात्र चांगली राहिली आहे.
अमरावती जिल्ह्यातून दरमहा 153 कोटी रुपये जीएसटी वसुलीचा लक्ष्यांक आहे. ही करवसुली नियमित व्यवसायाशी जोडलेली आहे. याशिवाय अन्य माध्यमांतून वसूल होणाऱ्या जीएसटीमुळे महसुलात भर पडते. केंद्रीय जीएसटी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार करवसुलीत या वेळी तब्बल 43 टक्के घट आली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठा बंद राहिल्याने करवसुलीवर मोठा परिणाम झाला आहे.

वाचा - धक्कादायक... तब्बल एक हजार ग्राहकांची फसवणूक, या डेव्हलपर्सपासून रहा सावध...

हॉटेल व्यवसायासोबतच पर्यटन, सिनेमा, ऑटोमोबाईल, कापड, जीवनावश्‍यक वस्तू या व्यवसायातून मोठा कर मिळतो. मात्र मार्च अखेरीस लागू झालेल्या लॉकडाउन ते जून महिन्यापर्यंत स्थानिक कार्यालयांकडून वसूल करण्यात येत असलेल्या करवसुलीवर परिणाम झाला आहे. यादरम्यान बाजारपेठ बंद राहिल्याने व उलाढाल न झाल्याने 21 टक्के घट आली. फेब्रुवारीपर्यंत 153 कोटी रुपये करवसुलीच्या असलेल्या लक्ष्यांकात घट येऊन तो 87 कोटी 21 लाख रुपयांवर घसरला. एप्रिल ते मेपर्यंत तुलनात्मक वाढ झाली. या कालावधित बाजारपेठा उघडण्यात आल्याने हा फरक जाणवला. आता बाजारपेठ नियमित सुरू झाल्याने कर वसुलीवर फरक पडणार असून तो वाढण्याची अपेक्षा आहे. संक्रमणाच्या या काळात मात्र 43 टक्के कमी वसुली झाली आहे. ही स्थिती सुधारणार असल्याचे जीएसटी अधिकारी जे. डी. मडावी यांनी सांगितले.

संपादन - नरेश शेळके 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST collections down in Month in Amravati