"गार्जियन्स ऑफ ह्युमॅनिटी'ने डॉ. बंग दाम्पत्य सन्मानित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

गडचिरोली : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाद्वारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना "गार्जियन्स ऑफ ह्युमॅनिटी' या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजस्थानमधील माउंट अबू येथील विश्‍वविद्यालयाच्या जागतिक मुख्यालयात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. राणी बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

माऊंट अबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयालयाच्या मुख्यालयात स्पिरिचुअलिटी फॉर युनिटी, पीस ऍण्ड प्रोस्पेरिटी (ऐक्‍य, शांती आणि समृद्धीसाठी अध्यात्म) या विषयावर जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातून 15 हजार प्रतिनिधी परिषदेसाठी आले होते. अध्यात्माच्या माध्यमातून जगात कशाप्रकारे शांतता नांदविता येईल व ऐक्‍य प्रस्थापित करता येईल या विषयावर विविध सत्रांमध्ये परिषदेत चर्चा झाली. परिषदेत "गार्जियन्स ऑफ ह्युमॅनिटी' हा मानाचा पुरस्कार देण्यासाठी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना निमंत्रित करण्यात आले होते. बंग दाम्पत्याने मानवाधिकार आणि जगाला पूर्वीपेक्षा अधिक चांगले बनविण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रामाणिक आणि समर्पित सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्‍वविद्यालयाच्या प्रमुख डॉ. जानकी दीदी आणि उपप्रमुख बी. के. हिरदया मोहिनी यांच्या हस्ते दोघांच्या वतीने डॉ. राणी बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The "Guardian of Humanity" honors Dr. Bang