esakal | Sad Story : तीनचाकी रिक्षावर चालतो गुलमोहम्मद शेखचा व्यवसाय; सोळाव्या वर्षांपासून लागले कामाला

बोलून बातमी शोधा

Gulmohammad Sheikh's business runs on a three wheeled rickshaw

आब्बास हे आर्णी तालुक्यातील अमराईपुरा येथे राहतात. वयाच्या सोहाळ्या वर्षांपासून ते तीनचाकी रिक्षावर जनरल स्टोअर्सचे दुकान चालवत आहे. सकाळी चार वाजतापासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत गावी गावी फिरून जनरल स्टोअर्सचा छोटासा व्यवसाय करतात. आब्बास यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे.

Sad Story : तीनचाकी रिक्षावर चालतो गुलमोहम्मद शेखचा व्यवसाय; सोळाव्या वर्षांपासून लागले कामाला
sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : नाव गुलमोहम्मद शेख आब्बास... वय ४१ वर्ष... शिक्षण चौथीपर्यंत... व्यवसाय तीनचाकी रिक्षावर जनरल स्टोअर्सचे दुकान... गावोगावी जाऊन व्यवसाय करणे... रिक्षावर पायानी पायडल मारुन आतड्याचा गोळा येईपर्यंत गावोगावी फिरून जनरल स्टोअर्सचे सामान विकून उदरनिर्वाह चालतो. मात्र, आता विविध समस्यांनी ग्रासले आहे. व्यवसाय होत नसल्याने जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

आब्बास हे आर्णी तालुक्यातील अमराईपुरा येथे राहतात. वयाच्या सोहाळ्या वर्षांपासून ते तीनचाकी रिक्षावर जनरल स्टोअर्सचे दुकान चालवत आहे. सकाळी चार वाजतापासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत गावी गावी फिरून जनरल स्टोअर्सचा छोटासा व्यवसाय करतात. आब्बास यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे.

हेही वाचा - अति घाई संकटात नेई! शासनाची घाई लोकप्रतिनिधींच्या मुळावर; थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द

तीनचाकी रिक्षाचे पायडल मारून तालुक्यातील जवळा, सातारा, हेटी, दत्तरामपूर, मनपूर, रुद्रापूर, देऊरवाडा अदी गावोगावी फिरून जनरलचे सामान विक्री करणारे आब्बास यांनी कमावून आणलेल्या दोन पैशातून पत्नी साहाजापरवीन शेख घर सांभाळतात. शिक्षणाचे महत्व असणाऱ्या आब्बास यांना तीन आपत्य आहेत. मोठी मुलगी सानिया शेख ही बारावीत शिक्षण घेते. दुसरा मूलगा सुहाआन शेख हा वर्ग दहावीत तर तिसरा मूलगा आब्बास शेख हा सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे.

रिक्षावर पायडल मारून आतड्याचा गोळा येईपर्यंत गावोगावी फिरून मेकपचे सामान, नेल पॉलीश, बांगड्या, कानातील, नाकातील, घासणी, छोट्या बँकेट, चहाची व पाण्याची चाळणी, लहान मुलांचे खेळणे, केसाचे बो, पिना, आरसा, कंगवा, देवपूजन साहित्य, लेडीज पर्स आदी जनरल सामानाची विक्री करतात. एका दिवसात तीनशे ते चारशे रुपये कमवितात.

अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम

घामाचा एक एक थेंब गाळून दोन पैसे कमावण्याची जिद्द मनात बाळगून आपल्या कुंटुबीयांचा उदरनिर्वाहाचा गाडा तीन चाकी रिक्षाच्यावरील जनरल स्टौअर्सच्या व्यवसायातून करीत असल्याने शहरासह तालुक्यात गुलमोहम्म शेखच्या कष्टाचे कौतुक होत आहे.