अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

sumant tekade.
sumant tekade.

अकोला : चोहीकडे अत्याचाराची मालिका सुरु असताना भारत हतबद्ध झालेला होता. देवगिरीचे पतन झाले होते. पुरुषांच्या हातात बांगड्या घालण्याची वेळ आली. जेथून पुढे कुणीही 300 वर्षे हत्यारं उचलू शकणार नाही. अशा काळात छत्रपतींनी पुढे येऊन सर्वांना संघटीत करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. कविभूषण यांच्या शब्दाचा संदर्भ देत ‘शिवाजी न होते तर सुन्नत होती सबकी’ असे म्हणून डॉ.सुमंत टेकाडे हे चांगलेच कडाडत शिवाजी महाराजांच्या संघर्षमयी इतिहासाची उकल त्यांनी केली. 

रा.तो.आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (ता.१७) काकासाहेब ठोंबरे स्मृती वाचनालयाच्यावतीने स्व.किशोरी हरिदास (बेबीआत्या) यांच्या स्मृती द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कर्यक्रमाचे दुसरे पुष्प गंफताना ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावावर त्यांनी आपल्या जाज्वल्य शब्दात छत्रपतींच्या व्यवस्थापन कौशल्याची माहिती उपस्थित जनसमुदायाला दिली. यावेळी उद्योजक किशोर अभ्यंकर, किशोर पिंपरकर हे विचारपिठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना टेकाडे म्हणाले की, ‘अफजलखानाने पंढरपूर, तुळजापूरचे मंदिर फोडले. पण महाराज शांत होते. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अफजलखानाला याचे आश्चर्य वाटत होते. अखेर त्यानेच महाराजांकडे वकील पाठवला. त्याने शिवाजी महाराज आक्रमक होतील, असे त्याला वाटले होते. पण, ‘मै अफजलखान के सामने कमजोर हूँ’ अशी प्रतिक्रिया महाराजांनी दिली. जावळीत समर्पणाची तयारीही दाखवली. शिवाजीला अटकेत घेण्यासाठी अफजलखान मोठ्या अविर्भावात आला, पण महाराजांनी मानसशास्त्रीय व्यवस्थापनातून त्याचा वध केला. अफजलखान ताकदवान होता, यात वादच नाही. श्रीलंकेपर्यंतचे राजे त्याच्या नावाने कापायचे. पण, त्याच्याकडे अहंकार होता आणि शिवाजी महाराजांकडे कमालीची विनम्रता होती. ते सावध होते’, असे सांगित टेकाडे यांनी यावेळी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचे अनेक पैलू उपस्थितांसमोर उलगडून दाखवले. त्यांच्या या भाषणाला उपस्थितांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन मोहिनी मोडक यांनी केले.

हेही वाचा - युवा महोत्सवात थिरकली तरुणाई 

कर्तूत्वातून यश गाठा
छत्रपती शिवाजी महाराज हे माँ साहेब जिजाऊंच्या त्यागातून घडले. वयाच्या १५ वर्षांपासून त्यांनी स्वताःच्या आयुष्याचे ध्येय गाठले. संघटन शक्ति बळकट करीत त्यांनी शत्रूंना ‘नामोहरम’ केले. मात्र आता बहूतांश व्यक्तिंना ध्येयाची माहितीच नाही. अशी खंत व्यक्त करीत टेकाडे यांनी अभिनेता अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन तेंडूलकर, गिता फोगट यांच्या संगर्षाची उदाहरणे देत युवकांनी त्यांना आदर्श माणून पुढे चालावे, आयुष्याचा वेध घ्यावा आणि कर्तूत्वातून यश गाठण्याचाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com