क्‍वारंटाईन असूनही तो फिरायचा गावभर, अन महिला तर झाली चक्‍क गायब !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

वैद्यकीय तपासणी करून त्याला 14 दिवसांकरिता होम क्वारंन्टाईन केले होते .तसा शिक्का त्याच्या हातावरही मारला होता. मात्र हा गावभर फिरत होता. त्याच्या घरी नियमित तपासणी करायला गेलेल्या चमूलाहा रुग्ण घरी न आढळल्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस स्थानकात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विदेशातून 15 मार्चला परतलेल्या सोनेगाव हद्दीतील महिलेला विमानतळावर तपासून होम क्वॉरंटाइन करण्यात आले होते. ती महिला अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

यवतमाळ : घर सोडून गावात फिरणाऱ्या कोरोना होम क्वारंन्टाईन संशयित रुग्णावर यवतमाळ जिल्ह्यातील वणीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे . हा रुग्ण साधारण एका आठवड्यापूर्वी दुबईहुन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे परत आला होता. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला 14 दिवसांकरिता होम क्वारंन्टाईन केले होते .तसा शिक्का त्याच्या हातावरही मारला होता. मात्र हा गावभर फिरत होता. त्याच्या घरी नियमित तपासणी करायला गेलेल्या चमूलाहा रुग्ण घरी न आढळल्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस स्थानकात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विदेशातून 15 मार्चला परतलेल्या सोनेगाव हद्दीतील महिलेला विमानतळावर तपासून होम क्वॉरंटाइन करण्यात आले होते. ती महिला अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात संशयित रुग्णांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. वैद्यकीय चमूंकडून त्यांची नियमित चाचणी करण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यातील एक व्यक्ती दुबईला सुतार कामासाठी गेला होता. साधारणपणे एका आठवड्यापूर्वी तो वणी येथे परत आला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्याला 14 दिवसांसाठी होम क्वारंन्टाईन करण्यात आले होते . व्यक्‍ती वैद्यकीय चमुशी सतत वादविवाद करायचा. त्याच्या घरी रोजच्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी करायला गेलेल्या चमूला सदरहू व्यक्ती घरी न सापडल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संशयित रुग्णास आता यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातील विलीनीकरण कक्षात पाठविणार असल्याचे समजते.

सविस्तर वाचा - पोलिस इन ऍक्‍शन मोड! रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप, उठाबशांचीही शिक्षा

सोनेगाव हद्दीतील रहिवासी असलेली ही महिला 15 मार्चला शारजहा येथून परतली होती. तिची विमानतळावर तपासणी करून तिला घरी क्वॉरंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तिची नियमित तपासणीही सुरू होती. नेहमीप्रमाणे सोमवारी सोनेगाव ठाण्याचे पोलिस अधिकारी महिलेकडे गेले असता ती घरी नव्हती. घराला कुलूप असल्याने त्यांनी चौकशी केली. त्यात ती उत्तर प्रदेशातील जोनपूर येथे माहेरी गेल्याची शेजाऱ्यांनी माहिती दिली. घरी राहण्याचे आदेश असतानाही महिलेने आदेशाचे उल्लंघन केले. तसेच क्वॉरंटाइन नियमांचेही उल्लंघन केले आहे. तिचे हे कृत्य संक्रमणाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He is a corona suspected but never stay at home