आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने चिमुकल्या मुलींना घरात बोलाविले आणि केले असे... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

पीडित दोन्ही मुली व आरोपी शाकीर यांच्या कुटुंबामध्ये सलोख्याचेही संबंध होते. परंतु नराधम शाकीरची वाईट नजर आपल्या मुलींसमान त्या चिमुकल्या मुलींवर गेली. त्याने शनिवारी (ता.30) सायंकाळच्या वेळी दोन्ही मुलींना आईस्क्रिम खाण्याच्या बहाण्याने घरात बोलाविले.

अमरावती : वडिलासमान असलेल्या व्यक्तीने चिमुकल्या दोन्ही बहिणींना आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले आणि त्यानंतर दहा वर्षांच्या मोठ्या बहिणीवर अत्याचार केला, तर लहानीसोबत अश्‍लील चाळे केले. दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित शाकीर हुसेन अमजद हुसेन (वय 40) याच्याविरुद्ध अत्याचारासह बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यान्वये रविवारी (ता.31) रात्री गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

पीडित दोन्ही मुली व आरोपी शाकीर यांच्या कुटुंबामध्ये सलोख्याचेही संबंध होते. परंतु नराधम शाकीरची वाईट नजर आपल्या मुलींसमान त्या चिमुकल्या मुलींवर गेली. त्याने शनिवारी (ता.30) सायंकाळच्या वेळी दोन्ही मुलींना आईस्क्रिम खाण्याच्या बहाण्याने घरात बोलाविले. नेहमीच्या ओळखीचे असल्याने त्या चिमुकल्या मुलींना काय माहीत या नराधमाच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे. त्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून त्याच्या सोबत गेल्या. घरी गेल्यानंतर त्याने मोठ्या मुलीवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर तिच्या 8 वर्षांच्या लहान बहिणीसोबत अश्‍लील चाळे केले. 

अवश्य वाचा-  विदर्भातील पाच विद्यार्थिनी अडकल्या कझाकिस्तानात; मायदेशी परतण्याची लागली  अोढ

घडलेल्या घटनेमुळे दोन्ही चिमुकल्या मुली पार घाबरून गेल्या होत्या. त्यांनी आई-वडील घरी आल्यानंतर रडतच संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला. आईवडिलांनी प्रथम आपल्या दोन्ही मुलींना आधी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पीडितांच्या पालकांनी दर्यापूर पोलिस ठाण्यात आरोपी शाकीर हुसेन अमजद हुसेन याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी शाकीर हुसेनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे दोघीही लहान बहिणी घाबरल्या होत्या. त्यांच्या मन:स्थितीचा विचार करून, महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन केले. 
- तपन कोल्हे, पोलिस निरीक्षक, दर्यापूर, ठाणे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He invited two small girls for ice cream and raped one