
श्रीरामपूर(पुसद) (जि.यवतमाळ) : लाकडाला जिवंत करणारी कला, काष्ठकला होय! लाकडाला जिवंत करतांना हातात कौशल्य असावं लागतं. त्यामध्ये वारशाबरोबरच कठोर व जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न आणि श्रमांचा 'वाटा' ही 'मोठा' असतो. वारशाने मिळालेल्या सुतारीच्या व्यवसायात आपल्या प्रयत्नांचे प्राण फुंकून चांगला काष्ठशिल्पकार म्हणून नावारुपास आलेल्या अशाच एका हाडाच्या कलावंताची ही संघर्षकथा.
रामदास कांबळे असं त्यांचं नाव,जो पुण्यात शिल्पाच्या क्षेत्रात भरारी घेत आहे !
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माळपठारावरील जवळा हे गाव! सदा सर्वकाळ पाण्याचं दुर्भिक्ष असणारा हा पुसद तालुक्यातील दुर्दैवी भाग!अवघे बारावीपर्यंतचे शिक्षण व त्यानंतर क्राफ्ट डी.एड्.करुन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारा परंतु बेकारीच्या सावटात काही तरी करावे म्हणून दगड,धातू,लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा मोती,मेण,पाॅलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन अथवा कोरुन त्रिमितीय आकृती अर्थात शिल्प तयार करण्याचे ठरविले.ही कला बालपणापासूनच अवगत. त्यात काष्ठकला ही कला जोपासत मोठा झालेला हा कलाकार कलेच्या दृष्टीने काहीसा लहानच होता. जिथं पिण्याच्या पाण्याचेच वांदे तिथे कलेला काय मोल असेल? त्यामुळे उपजत कला जोपासताना कांबळे यांची मोठी कसरत होत होती. पण प्रतिभेचं अंकुर कलाकाराला स्वस्थ थोडेच बसू देतं. जे स्वस्थ बसू देते ती कला नसते आणि तो कलाकारही नसतो! त्यामुळे मनात अंकुरलेल्या आणि हाताने साकारलेल्या कलेला प्रोत्साहनाचे सिंचन मिळण्यासाठी कांबळे यांनी भटकंती स्वीकारली. पुसदमध्ये विविध प्रकारचे काष्ठ तयार करण्याबरोबरच माती,धातू आदींपासून विविध शिल्पे साकारत त्यामध्ये गुण,अवगुण,स्वभाव,राग,लोभ,प्रेम,जिव्हाळा,मैत्रीसह सजिवता आणि सादृश्यता या वैशिष्ट्यांनी परीपूर्ण असणारे शिल्प तयार केले व जवळपास दोन दशके अनेक गावं, ठिकाणं,नगरं फिरून झाली. पण मनाजोगा दर्दी कुणी मिळाला नाही. आपल्या मित्राची होणारी ही अस्वस्थता मित्राला न कळेल असे थोडेच होणार होतें? रामदास कांबळे यांच्या मदतीला पुण्यातला आर्किटेक्चर असलेला मित्र प्रशांत हरसुलकर धावून आला. आणि कलेला कला मानणारा प्रोत्साहन देणारा अस्सल कलाकार माणूसही! कलेच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजेच पुण्यात महेंद्र थोपटे यांना भेटल्यानंतर कांबळेच्या कलेतील कल्पकतेला हेरुन त्यांनी त्याला स्वत:च्या मार्गदर्शनात धायरी,पुणे येथील आपल्या कला संस्कार आर्ट स्टुडिओत क्रीएटीव्ह आर्टीस्ट म्हणून ठेवले असून त्याच्या काष्ठकलेसह शिल्पकलेला छान धुमारे फुटत आहेत. त्याच्या रोजगाराचाही प्रश्न मिटला आहे.
रामदास हा सर्वसामान्यांना परमेश्र्वराशी जोडून देणारा एक मुलभूत दूवा ठरुन त्याची शिल्पे 'मास्टर पिस' म्हणून ओळखली जावी अशी भाबडी आशा आता जवळावासियांना लागली आहे.
लॉककडाऊनच्या काळात अख्ख जग थांबलं असतांना रामदास यांच्या काष्ठ व शिल्प कलेचं काम अविरत सुरू आहे. त्यांनी अनेक मुर्त्या, वस्तू साकारल्या असून त्यासाठी धातू, कागद, कापड, माती,मोती अशा नानाविध वस्तू वापरल्या आहेत. त्याच्या कलेला विद्येची जोड देण्यासाठी धोपटे यांनी कांबळे यांना पुण्यातील भारती विद्यापीठातून जीडी आर्टमधील शिल्प कलेमधून शिक्षण घेण्यासाठी आग्रही आहेत.
शिल्पकार महेंद्र धोपटे यांनी रामदासच्या हातून साकारलेल्या या वस्तू, शिल्प कमालीचे 'भाव' खाऊन जात आहेत. आणि हीच बाब रामदास कांबळे यांना आपली कला जिवंत ठेवून ती वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे. आपल्या कलेच्या व्यासंगाने काष्ठ शिल्प साकारणारा हा कलाकार साहित्य क्षेत्रातही पाय रोवू पाहत आहे. कवी मनाच्या या कलाकाराचा 'उमज' हा काव्यसंग्रह त्यांच्या शिल्पाप्रमाणेच हळूहळू आकार घेत आहे.
सविस्तर वाचा - प्रेयसी दुस-याबरोबर सेट झाल्याने टिकटाँवर टाकले दर्दभरे व्हिडिओ अन्
उपजत कलावंत
ग्रामीण भागातील अल्प शिक्षण घेतलेल्या रामदास कांबळे या कलाकारामध्ये उपजतच अनेक क्षमता आहेत.आर्ट डायरेक्शन मध्ये हातखंडा असून त्याच्या कलेचा शास्त्रशुद्धपणे विकास होण्यासाठी त्याला पाच वर्षाचा जीडीआर्टमधील शिल्पकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे नाव कला विद्यालयात दाखल करणार आहोत.
महेंद्र धोपटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.