esakal | 'तो' सतत फोन करून द्यायचा त्रास म्हणून तिने उचलले टोकाचे पाऊल .. वाचा काय आहे प्रकरण..   
sakal

बोलून बातमी शोधा

he message her continuously she filed FIR against him in Amravati

अमरावतीत ग्रामीण भागातील एका विवाहित महिलेचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. वर्षभरापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र एक दिवस या प्रेमाला महिलेने ब्रेक लावला. पण त्यामुळे संतापलेल्या तिच्या प्रियकराने असे काही कृत्य केले की या महिलेला थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले.

'तो' सतत फोन करून द्यायचा त्रास म्हणून तिने उचलले टोकाचे पाऊल .. वाचा काय आहे प्रकरण..   

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती: प्रेम म्हणजे एक निरागस भावना, विश्वास, आनंद. प्रेमात असलेले अनेकजण एकमेकांसाठी जीव देण्याची सुद्धा तयारी ठेवतात. प्रेमात विश्‍वास सगळ्यात महत्त्वाचा असतो. पण कुणालाही बळजबरीने  प्रेम करण्यास भाग पाडणे हा गंभीर गुन्हा आहे.  प्रेमात बळजबरी केलीच तर कधी काय होईल याच काही नेम नाही. अशीच एकतर्फी प्रेमातून एक प्रकार अमरावतीत घडला आहे.  

अमरावतीत ग्रामीण भागातील एका विवाहित महिलेचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. वर्षभरापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र एक दिवस या प्रेमाला महिलेने ब्रेक लावला. पण त्यामुळे संतापलेल्या तिच्या प्रियकराने असे काही कृत्य केले की या महिलेला थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले.

हेही वाचा - बाप रे! नागपुरात कुत्र्याला कोरोना?... कुत्र्याला खोकला झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण..

सतत फोन करून द्यायचा त्रास

रितेश रमेश चांदणे (वय 40) सोबत तिचे प्रेमसंबंध होते. एक महिन्यापासून तिने रितेशसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले नाहीत. मात्र या दरम्यान रितेशने या महिलेशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिला सतत फोन करून तो त्रास देऊ लागला. 

महिला घरी एकटी असताना केला फोन

एक दिवस महिला घरी एकटी असताना रितेशने पुन्हा तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिला फोन करून त्रास देऊ लागला. महिलेने त्याला फोन करू नको असे स्पष्ट शब्दात सुनावले. पण रितेशच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. 

अधिक माहितीसाठी - खजूर खा आणि आजारांना विसरा.. जाणून घ्या नियमित खजूर खाण्याचे फायदे...

प्रेमसंबंधाला ब्रेक, मॅसेज मात्र सुरू 

त्याने पुन्हा फोनवरून ती प्रतिसाद देत नसल्याचे बघून तिच्या व्हॉट्‌सऍपवर मॅसेज पाठविला. भेटण्याचा आग्रह धरला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने मोर्शी ठाण्यात तक्रार नोंदविली. प्रकरणी पोलिसांनी रितेश चांदणेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात रितेशला अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ  

loading image