esakal | अशी ही बनवाबनवी! कोणी केली व नेमकी कशासाठी? वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

crime

विम्याच्या रकमेसाठी तंटामुक्त समिती अध्यक्षाने वाटमारीचा बनाव केल्याचा प्रकार वरठी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला. पाचगाव फाट्यावर चौघांनी अडवून सोन्याचे दागिने लुटल्याची तक्रार दिली होती. मात्र, चौकशीत त्याने हे दागिने एका बॅंकेत गहाण ठेवल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अशी ही बनवाबनवी! कोणी केली व नेमकी कशासाठी? वाचाच

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

वरठी(जि. भंडारा) : आर्थिक अडचणीमुळे सोन्याची चेन आणि अंगठी १५ ते २० दिवसांपूर्वी भंडारा येथील एका बॅंकेत गहाण ठेवली आहे. त्यावर ७७ हजार रुपयांचे कर्ज उचलले आहे. तसेच हेच दागिने पूर्वी एका फायनान्स कंपनीतही गहाण ठेवले होते. त्यावेळी त्याचा विमा काढण्यात आला होता. तेव्हा विमा एजंटने दागिने चोरीच्या तक्रारीची पोलिस पावती दिल्यास तुला एक लाख रुपये मिळतील, असे सांगितले होते. त्या एजंटवर विश्‍वास ठेवून मधुकर पटले याने वाटमारीचा बनाव करून पोलिसांत खोटी तक्रार दिली होती. परंतु, पोलिसांच्या तपासात तो स्वतः:च अडकला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात, हवालदार संदीप बांते, त्रिमूर्ती लांडगे, नितीन भालाधरे करीत आहेत.

विम्याच्या रकमेसाठी तंटामुक्त समिती अध्यक्षाने वाटमारीचा बनाव केल्याचा प्रकार वरठी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला. पाचगाव फाट्यावर चौघांनी अडवून सोन्याचे दागिने लुटल्याची तक्रार दिली होती. मात्र, चौकशीत त्याने हे दागिने एका बॅंकेत गहाण ठेवल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मोहाडी तालुक्‍यातील पाचगाव येथील तंटामुक्त समितीचा अध्यक्ष मधुकर छोटेलाल पटले (वय ४२) असे बनाव करणाऱ्याचे नाव आहे. तो वरठी येथे नेहमी मोटरसायकलने जाणे-येणे करीत असतो. सोमवारी सायंकाळी वरठी येथे येत असताना चार अनोळखी इसमांनी अडवून सोन्याची चेन व अंगठी हिसकावून नेली, अशी तक्रार त्यांनी वरठी पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात चार व्यक्तींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा नोंदविला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मधुकर पटले यांची उलट तपासणी सुरू केली. सुरुवातीला तो काहीही सांगत नव्हता. परंतु, पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने खरी हकिगत सांगितली.

सविस्तर वाचा - गडचिरोली जिल्ह्यात समस्यांचीच जंत्री! कधी सुटणार अडचणींचे ग्रहण?

चोरीचा बनाव
वाटमारी झाल्याची तक्रार प्राप्त होताच चार अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र, चौकशीत तक्रारकर्त्यानेच चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले. आता या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशावरून पुढील कारवाई केली जाईल.
राजेशकुमार थोरात
पोलिस निरीक्षक वरठी

 
संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top