त्याने ग्रामीण भागात केली चित्रपट निर्मिती.. कावली येथील ध्येयवेड्या युवकाचा चित्रपट निर्मितीचा ध्यास

he produced film in his village read his success story
he produced film in his village read his success story

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : चित्रपट सृष्टीचे मृगजळ प्रत्येकाला हवेहवेसे वाटते.या संगणकीय युगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चित्रपट निर्मिती होते त्याला फार मोठ्या धनदांडग्यांच्या मदतीची गरज असते. मात्र ग्रामीण भागातील साधनसंपत्ती आणि स्वतःचे कौशल्य वापरून एका खेड्यातील युवकाने शिक्षणाची शिदोरी या नावाचे गावातच लघुपट निर्मिती केली आहे त्याचे नाव निखिल मानकर असून याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून इच्छाशक्तीच्या बळावर आपण कोणतेही ध्येय साध्य करु शकतो हे या होतकरू  सर्वसाधारण युवकाने चक्क चित्रपट निर्मिती करून सिद्ध केले आहे.

ग्रामीण भागातील आई वडील गरिबीमुळे मुलीला कमी शिकवून तिचे लग्न पटकन करून देतात व मुलगा कितीही अव्याळ असला तरी त्याला शिक्षणासाठी पैसा खर्च करतात पण हाच अव्याळ मुलगा आपल्या आई वडिलांचे काबाड कष्ट पाहून उच्चशिक्षित होऊन मोठा अधिकारी बनतो व शिक्षणाचा प्रसार करतो,अश्या कथानकातून तालुक्यातील कावली येथील युवकाने शिक्षणाचे महत्व पटवून देत "शिदोरी शिक्षणाची"या लघु चित्रपटाची निर्मिती  केली आहे.त्याच्या या सृजनशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या लघुपटाची निर्मिती निखिल मानकर यांनी केली असून कथा व  दिग्दर्शक अभिषेख नायडू व राहुल कोलते (नागपुर) हे आहेत. यामध्ये मुख्य कलाकार म्हणून सुसंगत टाले,निलेश मोहकार (कावली),स्नेहल नेवारे (दाभाडा),सुनील थुल,प्रणिता थुल(जळका), विलास हेंडवे(वाघोली),मोहन लोंदे ,प्रशांत डहाके(मंगरुळ),सिद्धार्थ हेंडवे,ओंकार उंदरे(धामणगाव),अनिल भोळे (मंगरुळ) ,किशोर डेरे(पिंपळखुटा),गजेंद्र रोडे (कावली) यांनी भूमिका साकारली आहे.
 
ग्रामिण भागात शिक्षणाविषयी असलेली आई वडिलांची भुमिका,शिक्षण घेतांना मुलगा-मुलगी हा भेदभाव न ठेवता दोघांनाही समान दर्जाचे शिक्षण घेता येणे,हा लघुपटाचा मुख्य उद्देश आहे.या लघु चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारी महिन्यात घेण्यात आले होते.

या लघुचित्रपटाचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२०करण्यात आले आहे. या लघुचित्रपटाचे चित्रीकरण आस्था डिजीटल स्टुडिओ कावली येथे निखिल मानकर यांनी केले. तर निलेश नेवारे,श्रीधर वाघाडे,अभिजित हेंबाडे,उद्देश सोनटक्के, तेजस मानकर,नितीन टाले यांची मदत मिळाली.

यांचे लाभले सहकार्य 

कावली येथील लाभचंद मुलचंद राठी विद्यामंदीराचे प्राचार्य सिद्धार्थ हेंडवे,ओंकार उंदरे,जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक शरद बेदूरकर,शिक्षक प्रफुल्ल डाफ, शकील पठाण,अविनाश तितरे,गजेंद्र रोडे,नरेंद्र भोंगाडे, प्रशांत टांगले,निलेश मोहकार यांचे सहकार्य लाभले,असे निखिल मानकर यांनी सांगितले.
 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com