दहा एकरांतील सोयाबीनवर फिरविला त्यांनी नांगर... हे आहे कारण 

Tractor
Tractor

मुळावा (जि. यवतमाळ) : यंदा कापूस खरेदीचे वांदे झाल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे आहे. मात्र, बियाणे कंपन्यांनी विकलेले बियाणे उगवत नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. उमरखेड तालुक्‍यातील मुळावा येथील शेतकरी अभय उबाळे यांनी सोमवारी (ता.22) चक्क दहा एकर शेतात पेरणी केलेल्या सोयाबीनवर ट्रॅक्‍टर फिरविला. दरम्यान, नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे. 

शेतकऱ्यांच्या मागे एकामागून एक संकटे येत आहेत. यंदा पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत. मुळावा येथील शेतकरी अभय उबाळे यांनी दहा एकरांवर सोयाबीनच्या पेरणी केली. पेरणीनंतर पाऊस आल्याने पेरणी साधेल, असा विश्‍वास होता. मात्र, पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे हताश शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनवरच नांगर फिरविला. सरकारमान्य कंपनीकडून प्रमाणित बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. दुबार पेरणी करायची ठरविली तरी पुन्हा कोणते बियाणे वापरायचे, बियाणे खरेदीसाठी पैसे आणायचे कोठून असे अनेक आहेत. त्यामुळे यंदाही खरीप हंगाम हातचा जाण्याची चिन्हे आहेत. 

जूनच्या सुरुवातीला परिसरात दमदार पाऊस झाल्याने 18 जूनपर्यंत मुळावासह परिसरातील बहुतांश शेतकरी वर्गाची पेरणी आटोपली. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती व जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तातू देशमुख यांनी वानेगाव, पार्डी बंगला, धनज, मोहदरी, आडद, पिंपळदरी, झाडगाव, तिवरंग, सुकळी, हातला, दिवटपिंपरी, कळमुला, पळशी, कुपटी, पोफाळी, भांबरखेडा इत्यादी गावांत पाहणी केली. यावेळी माजी उपसरपंच संजय रावते, जीवन ठेंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शबीर भाई, सोसायटीचे अध्यक्ष भय्यासाहेब देशमुख, अनिल बरडे, सुरेश जाधव आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ नुकसानभरपाई आवश्‍यक आहे. या वर्षी बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. अनेक ठिकाणांचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देणे आवश्‍यक आहे. 
- तातू देशमुख, माजी अर्थ व बांधकाम सभापती, जिल्हा परिषद, यवतमाळ. 


जिल्ह्यात निकृष्ट बियाणे कंपन्यांचे सोयाबीन घाऊक विक्रेत्यांनी वितरकांमार्फत शेतकऱ्यांना विक्री केले. सोयाबीन उगवले नसल्याबाबत आतापर्यंत 549 तक्रारी आलेल्या आहेत. कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे निकृष्ट बियाणे विकणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. 
- बाळासाहेब कामारकर, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, यवतमाळ. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com