esakal | तीन महिन्यांची गर्भवती माहेरी आली अन्‌ लोटा घेऊन शौचास गेली, पुढे...
sakal

बोलून बातमी शोधा

The body of a pregnant woman was found in Chandrapur district

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यात येणाऱ्या भंगाराम तळोधी येथील रहिवासी रूचीता चिट्टावार (वय 19) हिचा विवाह लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी 19 मार्च रोजी झाला. ती पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. तिचा सुखी संसार सुरू होता. तीन महिन्यांतच तिने सारसच्या कुटुंबीयांना आपलेसे करून घेतले होते. अशात चार दिवसांपूर्वी रूचीता भंगाराम तळोधी येथे आपल्या माहेरी आली होती. 

तीन महिन्यांची गर्भवती माहेरी आली अन्‌ लोटा घेऊन शौचास गेली, पुढे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील भंगाराम तळोधी येथील रहिवासी असलेल्या तरुणीचा विवाह लॉकडाउन सुरू होण्याचा पाच दिवसांपूर्वी झाला. ती आपल्या सासरी चांगली नांदत होती. पती-पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. तसेच सासरच्या मंडळींनाही तिने आपले करून घेतले होते. यामुळे तिचा सुखी संसार सुरू होता. अशात ती चार दिवसांपूर्वी माहेरी आली अन्‌ पुढील घटनाक्रम घडला....

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यात येणाऱ्या भंगाराम तळोधी येथील रहिवासी रूचीता चिट्टावार (वय 19) हिचा विवाह लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी 19 मार्च रोजी झाला. ती पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. तिचा सुखी संसार सुरू होता. तीन महिन्यांतच तिने सारसच्या कुटुंबीयांना आपलेसे करून घेतले होते. अशात चार दिवसांपूर्वी रूचीता भंगाराम तळोधी येथे आपल्या माहेरी आली होती.

जाणून घ्या - शिक्षकांनो व्हा सावधान ! दहा शिक्षकांवर झाली "ही' कारवाई, काय गुन्हा होता "त्यांचा', वाचा...

रविवारी सायंकाळच्या सुमारास ती शौचास जाण्यासाठी लोटा घेऊन घराबाहेर पडली. परंतु, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. यामुळे नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळांनी गावालगत असलेल्या विहिरीजवळ नागरिकांना लोटा व चप्पल आढळून आली. यामुळे शंकेची पाल चुकचुकली. गोंडपिपरी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचीताचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळ परिसरात खळबळ माजली आहे. 

कुटुंबीयांना प्रचंड धक्का

लॉकडाउनच्या काही दिवसांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. रूचीताचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत. तिने आत्महत्या केली घात झाला, अशी चर्चा नागरिक करीत होते. रूचीताच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्‍का बसला आहे. ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पटले हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

क्लिक करा - 'प्लान बी'सुद्धा तयार ठेवा; या नवनियुक्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला कानमंत्र

तीन महिन्यांची गर्भवती

रूचीताचा विवाह लॉकडाउनच्या ती तीन महिन्यांपूर्वी झाला होता. ती चंद्रपुरात वास्तव्यास होती. ती तीन महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. अशात ती चार दिवसांपूर्वी काही दिवस माहेरी राहण्यासाठ आली. रविवारी शौचास जाते असू सागून घराबहेर पडली आणि तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. 

शवविच्छेदनास विलंब

रूचीताचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. यानंतर तिचे शव गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिक्षक उपस्थित नव्हते. तीन महिन्यांची गर्भवती असल्याने दुसऱ्या डॉक्‍टरांनी आपणाकडून शवविच्छेदन शक्‍य नसल्याचे सांगितले. यामुळे काल रात्री तिचे शव चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. 

loading image