हृदयद्रावक : घरी जाण्याचा परवाना मिळाल्याने झाला होता आनंद, मात्र घरी पोहोचण्याआधीच क्षणार्धात बदलला दुःखात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

लॉकडाऊनमध्ये अडकलेले अनेक जण आपापल्या घरी मिळेल त्या वाहनाने जात आहेत. तर काही स्वतःच्या दुचाकीने प्रवास करीत आहेत.

बाळापूर (जि.अकोला) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर शहरा नजीक घडली. जखमींमध्ये एका अकरा वर्षीय मुलीचा समावेश आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेले अनेक जण आपापल्या घरी मिळेल त्या वाहनाने जात आहेत. तर काही स्वतःच्या दुचाकीने प्रवास करीत आहेत. आज सकाळच्या सुमारास मुंबईहून जोहानपूरकडे दुचाकीने निघालेल्या तिघांना बाळापूर जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकी क्रमांक एम. एच. 04 सी एक्स 483 या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कमलाशंकर चवथीराम यादव रा.खुंटरी (ता.मछली) जोहानपूर उत्तरप्रदेश याचा मृत्यू झाला. 

आवश्यक वाचा - ...अन् राज्याच्या सत्तेतील भागीदारांचे या निवडणुकीत बिनसले; शिवसेनेला दूर ठेवत काँग्रेसने असे बसवले सत्तेचे गणित

तर सूचित राजबहाद्दूर यादव व चिमुकली मानवी यादव हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले या संदर्भात पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

घरी जाण्याचा परवाना घेऊन तो गेला देवाघरी
उत्तरप्रदेश येथील मजूर लॉकडाउनमुळे मुंबई येथे अडकले होते. मात्र, त्यांना आपल्या घरी जाण्यासाठी परवानगी देण्यात आल्याने मृतक व अन्य लोकांना आनंद झाला. ते मुंबईवरून तिघेजण एकाच दुचाकीवर बसून निघाले. आज सकाळी बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या भिकूंड नदीच्या पुलाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामधील कमलाशंकर यादव ठार झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He went to God's house with a license to go home