esakal | ...अन् राज्याच्या सत्तेतील भागीदारांचे या निवडणुकीत बिनसले; शिवसेनेला दूर ठेवत काँग्रेसने असे बसवले सत्तेचे गणित
sakal

बोलून बातमी शोधा

lonar nagar palika election.jpeg

स्थानिक नगरपालिकेत काँग्रेसचे 10 तर शिवसेनेचे 7 सदस्य जनतेतून निवडून आले. या नुसार सुरवातीला महाविकास आघाडी नसल्याने व काँग्रेसचे बहुमत असल्याने काँग्रेसने सर्व समित्यावर सत्ता मिळवली.

...अन् राज्याच्या सत्तेतील भागीदारांचे या निवडणुकीत बिनसले; शिवसेनेला दूर ठेवत काँग्रेसने असे बसवले सत्तेचे गणित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणार (जि.बुलडाणा) : स्थानिक नगरपालिकेच्या सभापती पदाची निवडणूक आज (ता.8) उत्साहात पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एक हाती समित्या मिळवल्या. यामध्ये सर्व सदस्याची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत काँग्रेस पदाने एकहाती सत्ता घेत शिवसेनेला एकही समिती सभापती पद न मिळाल्याने शिवसेना सदस्यांनी बहिष्कार टाकत सह्या करत सभात्याग केला.

स्थानिक नगरपालिकेत काँग्रेसचे 10 तर शिवसेनेचे 7 सदस्य जनतेतून निवडून आले. या नुसार सुरवातीला महाविकास आघाडी नसल्याने व काँग्रेसचे बहुमत असल्याने काँग्रेसने सर्व समित्यावर सत्ता मिळवली. परंतु, यावेळी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने सर्व महाराष्ट्रात त्यांची एकमेकांसोबत मिळून सत्ता स्थापन केली व पदाची वाटणी केली. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून जिल्हापरिषद असो की पंचायत समिती असो की बाजार समिती सर्व ठिकाणी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. 

हेही वाचा - धक्कादायक! दारुड्याची पुन्हा एकदा अंगात फिनफिनली अन् त्याने नशेत वृद्धेला पतीसह...

त्या अनुषंगाने लोणार नगरपालिकेमध्ये शिवसेनेला समिती मिळणे आवश्यक होते. मात्र, काँग्रेसने त्यांचीच एक हाती सत्ता स्थापन केली. या सर्व गोष्टीनंतर शिवसेना सदस्यांनी सह्या करून त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत त्या ठिकाणावरून निघून गेले. या ठिकाणी महाविकास आघाडीचा काँग्रेसने धर्म न पाळल्यामुळे या ठिकाणावरून शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणावरून निघून गेले. या नंतर लोणार मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी दिसून आली. लोणारमध्ये सभापती पदाची निवड शिक्षण सभापती हे नियमानुसार उपाध्यक्ष बादशहा खान यांच्या कडेच कायम ठेवण्यात आले आहे. 

आवश्यक वाचा - धक्कादायक! साथ जी नही सकते, साथ मर तो सकते है ना, असे म्हणतं त्यांनी...

सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी वच्छलाबाई जगदीश खरात तर पाणी पुरवठा सभापती म्हणून आबेद खान मोमीन खान, आरोग्य सभापती पदी शेख फरजाणा बी शेख रुउफ, महिला व बालकल्याण सभापती पदी रंजनाताई राजेश मापारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  या वेळी गटनेते भूषण मापारी यांनी सर्व समित्या बिनविरोध निवडून आणल्या. यावेळी नगराध्यक्षा पूनमताई  पाटोळे, उपाध्यक्ष बादशहा खान, गटनेते भूषण मापारी, तालुकाध्यक्ष अध्यक्ष राजेश मापारी,शहर अध्यक्ष नितीन शिंदे,नगरसेवक जुबेदा बी रमजान परसुवाले, नसिमबानो मोहमद तोफिक कुरेशी, सौ जोत्स्ना ताई गुलाब सरदार, संतोष शेषराव मापारी, सौ पूजाताई सतिष राठोड, काँग्रेसचे जेष्ठ नेते साहेबराव पाटोळे, मो.तोफिक कुरेशी, भाई गुलाब सरदार, प्रा. गजानन खरात, रमजान परसुवाले, शेख रुउफ, सतीश राठोड, हे काँग्रेसचे उपस्थित होते. 

या निवडणुकीच्या प्रक्रियेवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. यावेळी गटनेते प्रा. बळीराम मापारी, डॉ. अनिल मापारी, संगीताताई संतोष मापारी, सुप्रिया गजानन मापारी, छगन कंकाळ, सिंधू गजानन जाधव, रेखा धर्मचंद लुणिया, मनिषा प्रवीण नेवरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, युवा सेना शहर प्रमुख गजानन मापारी उपस्थित होते. सदर निवडणुकीमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सेंफन नदाफ, मुख्याधिकारी विठ्ठल केदार आदी उपस्थित होते.

अन् काँग्रेसचा परडा भारी
मेहकर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड असून, काही महिन्यांपूर्वीच येथे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून प्रा. बळीराम मापारी यांची नियुक्ती केली. राज्यात महाआघाडी असतानाही लोणार नगरपालिकेच्या समिती निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी दिसून आली. यावेळी शिवसेनेला समिती न दिल्यामुळे त्यांनी या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला खरा परंतु, यावेळी काँग्रेसचा परडा भारी असल्याचे दिसून आले.