
चिमूर : तालुक्यातील जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तीन दिवसांपासून प्रकृती बिघडली आहे. यानंतर प्रशासन जागे झाले. शाळेतील पाच जलस्त्रोतांपैकी चार स्रोत हे दूषित असल्याचे तसेच जागतिक आदिवासीदिनी विद्यार्थ्यांना शिळे अन्न दिल्याचे तपासणीत समोर आले. यासर्व प्रकाराला अधीक्षक, मुख्याध्यापक, एकात्मिक आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.