हिंगणघाट जळीतकांड : सोमवारपासून सुनावणीला सुरुवात, उज्वल निकम हिंगणघाटात होणार दाखल

रूपेश खैरी
Sunday, 13 December 2020

या प्रकरणातील या आरोपी विकेश नगराळे याच्याविरुद्ध 426 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर 26 दिवसांत पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. कोविडमुळे थांबलेल्या या न्यायालयीन कामकाजाला आता वेग आला आहे.

वर्धा : हिंगणघाट येथील अंकिता पिस्सुडे यांच्या जळीतकांडात न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या सोमवारी (ता. 14) पासून सुरू होणार आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम हिंगणघाट येथे दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. 

हेही वाचा - आता मनपा कर्मचाऱ्यांना प्रत्येक शुक्रवारी सायकलवर येणे...

या प्रकरणातील या आरोपी विकेश नगराळे याच्याविरुद्ध 426 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर 26 दिवसांत पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. कोविडमुळे थांबलेल्या या न्यायालयीन कामकाजाला आता वेग आला आहे. हिंगणघाट येथेच अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे. यात पहिल्या दिवशीच्या न्यायालयीन कामकाजाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

हेही वाचा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थना मंदिराचा वाद...

हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारी २०२० रोजी प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर सर्वत्र मोर्चे काढून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. या बहुचर्चित जळीत प्रकरणाचे उद्यापासून कामकाज सुरू होणार आहे. 

हेही वाचा - फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय स्थगित : शासकीय जमिनीचा मालकी हक्क देण्यावर स्थगिती

आरोपी नागपूर न्यायालयात - 
या प्रकरणाचा आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यात निकाल लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोरोनामुळे न्यायालयीन प्रक्रियेला विलंब झाला. 

हेही वाचा - हॉटेल, बारमध्ये उशिरानंतरही वर्दळ; पोलिस आयुक्तांच्या अचानक भेटीमुळे ठाणेदारांची तारांबळ

फास्ट ट्रॅकची परवानगी रखडली -
या प्रकरणात 426 पानांचे आरोपपत्र पोलिसांनी 28 फेब्रुवारीला न्यायालयात दाखल केले आहे. सुरुवातीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फास्ट ट्रॅक वर्धेला उपलब्ध करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत परवानगी न मिळाल्याने हिंगणघाट येथे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. हिंगणघाटच्या न्यायालयात उद्यापासून कामकाज सुरू  होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hearing on hinghanghat professor burned case from tomorrow