
चान्नी: ग्राम पिंपळखुटा येथील तीन मित्र शनिवारी (ता.३०) सकाळी गावातील मन नदीवर पोहायला गेले होते. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी करण सुनील वानखडे हा पाण्यात बुडाला व पुन्हा दिसून आला नाही. बातमी लिहेपर्यंत त्याचा शोध सुरू होता.