

Tragic Heatwave Impact: Nagpur Witnesses 10 Suspected Heatstroke Deaths in a Day
sakal
नागपूर: शहरातील वाढत्या उष्णतेचा फटका नागरिकांना बसत असून, बुधवारी रेल्वेस्थानकासह आणि शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दहाही व्यक्ती आधी बेशुद्ध आढळल्याने उष्माघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील सात जणांना मेयोत तर तिघांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी याबाबत सर्व प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.