Vidarbha Heavy Rainfall : बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. ग्राम मार्ग बंद पडल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बुलडाणा : जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर असून बुलडाणा तालुक्यात गत ४२ तापापासून संततधार पाऊस सुरू आहे. मेहकर आणि लोणार तालुक्यात २५ जून सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून तो ढगफुटीसदृश स्वरूपात कोसळत आहे.