Vidarbha Flood : लोणार तालुक्यात ढगफुटी पावसाने माजवला धुमाकूळ, शेतकऱ्याचे पीक गेले वाहून ,सोमठाणा गावाचा संपर्क तुटला!
Lonar Flood : लोणार तालुक्यातील सोमठाणा आणि वडगाव तेजन नदीला पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते बंद झाले असून, शेतातील पिके वाहून गेली आहेत.
लोणार : गेल्या दोन दिवसापासुन सुरू असलेल्या पाउसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वडगाव तेजन नदीला पूर आल्याने मेहकर ते लोणार रस्ता बंद झाला आहे. सोमठाणा येथे पुलावरून पाणी गेल्याने सोमठाणा गावाचा संपर्क तुटला आहे.