Amravati News: सव्वादोन लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान; २६ जणांचा मृत्यू, १६ कुटुंबीयांना आर्थिक मदत
Crop Loss: अमरावती विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुके सर्वाधिक प्रभावित झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अमरावती : खरीप हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाने अमरावती विभागातील २ लाख २२ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. यासोबतच १ हजार ८७ हेक्टर जमीन खरडून गेली असून ५ हजार ७३४ हेक्टर जमिनीवर गाळ साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.