नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचीत राहणार नाही; अब्दुल सत्तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain Soybean crop damage compensation Abdul Sattar

नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचीत राहणार नाही; अब्दुल सत्तार

मंगरुळपीर : मागील व या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशीम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.मी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. ही सत्य परिस्थिती आहे. तरी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तिप्पट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगरुळपिर येथील जुन्या पंचायत समितीच्या सभागृहात शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसेना संपर्क यात्रेच्या दरम्यान दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे होते तर विशेष उपस्थिती मध्ये खासदार भावना गवळी,प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे, संजय आधारवाडे, तालुका प्रमुख मनीष गहूले, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब ठाकरे, नगर सेवक अनिल गावंडे हे होते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. या कामात कुठलीही हयगय होता कामा नये. बांधावर जाऊन उर्वरित पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

असेही यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना म्हटले येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या नुकसानाची भरपाई मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.व आजच सभा संपताच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घालून भरपाई चे आदेश काढतो असेही म्हटले. तर भावना गवळी यांनी वाशिम जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या लवकरात लवकर तयार करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी अब्दुल सत्तार यांना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव इंगळे यांनी केले तर आभार तालुका प्रमुख मनीष गहुले यांनी व्यक्त केले.

तालुका प्रमुख मनीष गहुले यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे निवेदने जमा करून कृषिमंत्री सत्तार यांचेकडे दिले व तालुका प्रमुख मनीष गहुले यांच्या नेतृत्वाखाली १०० युवकांनी कृषिमंत्री सत्तार व खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शहर प्रमुख शंकर ठाकूर, रवी लाभाडे,नवेद,डॉ गणेश राठी यांचेसह शिवसेनेचे सर्वच शाखाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Heavy Rain Farmers Soybean Crop Damage Compensation Abdul Sattar Agriculture News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..