Buldhana Heavy Rain: बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार! पुरात बापलेक अडकले, अनेक गावांचा संपर्क तुटला

Buldhana Heavy Rain update: आमदार आकाश फुंडकर यांनी अंत्रज, नागपूर, हिवरखेड, आणि ज्ञानगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Buldhana Heavy Rain
Buldhana Heavy Rainesakal

बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. खामगाव ते बुलढाणा दरम्यान रोहणा गावाजवळ असलेल्या नदीला महापूर आल्याने खामगावचा बुलढाण्याशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन तासांपासून रस्ता बंद झाल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत.

गारडगावला पुराचा वेढा-

खामगाव तालुक्यातील गारडगावला पुराचा वेढा पडल्याने दोन जण पुरात अडकले होते. आमदार आकाश फुंडकर यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाला सूचना दिल्या आणि पोकलँडच्या सहाय्याने त्या बापलेकांना बाहेर काढण्यात आले. गारडगाव आणि गावठाण या दोन्ही गावांचा नदीला पूर आल्याने संपर्क तुटला आहे.

पिंप्री गवली गावात पाणी घुसले-

पिंप्री गवली या गावाजवळील आवर धरण सांडवा पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने गावात पाणी घुसले आहे. चेतन फुंडकर यांनी ही माहिती आमदार आकाश फुंडकर यांना दिली. त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Buldhana Heavy Rain
Mumbai Heavy Rain: सहा तासात ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाने मुंबई तुंबली! प्रशासनाने काय केलं आवाहन?

प्रशासनाच्या सूचना-

आमदार आकाश फुंडकर यांनी अंत्रज, नागपूर, हिवरखेड, आणि ज्ञानगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या असून, कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Buldhana Heavy Rain
Mumbai Heavy Rain: सहा तासात ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाने मुंबई तुंबली! प्रशासनाने काय केलं आवाहन?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com