Gadchiroli Rain: गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे २१ मार्ग बंद; यवतमाळात शेतकरी गेला नाल्यात वाहून, गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडले
Gadchiroli Flood: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तब्बल २१ मार्ग बंद झाले आहेत, तर यवतमाळमध्ये एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडण्यात आले असून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.
नागपूर : गडचिरोलीत संततधार पावसासह गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील तब्बल २१ मार्ग बंद झाले आहेत.तर यवतमाळ येथील झरीजामणी तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी नाल्याच्या पाण्यात वाहून गेला आहे.