रात्री पावसाने धो-धो धुतले; शेतीचे झाले तलावात रूपांतर

रात्री पावसाने धो-धो धुतले; शेतीचे झाले तलावात रूपांतर

आर्वी (जि. वर्धा) : तीन दिवसांपासून रात्रीच्या अंधारात तालुक्याला पाऊस धो-धो धुवत आहे. यामुळे वर्धा, बाकली, आड नदीकाठावरील शेतात पाणी शिरल्याने शेतीचे तलावात रूपांतर झाले आहे. घराच्या भिंती व छत कोसळल्याने झोपेतच पती-पत्नीचा मृत्यू झाला. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ते सुद्धा काही काळासाठी बंद झाले होते. निसर्गाच्या अवकृपेमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

बुधवारी रात्री नागरिक साखर झोपेत असताना पावसाने धो-धो धुतले. अवघ्या दोन ते तीन तासांत परिसरातील नदी नाले भरभरून वाहू लागले. तळेगाव (शा.पं.) मार्गावरील वर्धमनेरी लगतच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आणि चार बसेस अडकून पडल्या. दुसरीकडे कौंडण्यपूर मार्गावरील पुलावरून सुध्दा पाणी वाहू लागलल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. एकीकडे धो-धो धूत असलेल्या पावसामुळे परिसरातील नदी नाले भरभरून वाहू लागले असताना दुसरीकडे प्रकल्प अधिकाऱ्यांनी अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग होऊन लागला आहे. यामुळे वर्धा नदी दुतर्फा वाहू लागली आहे. मात्र निम्न वर्धा धरणाला पाणी अडले.

रात्री पावसाने धो-धो धुतले; शेतीचे झाले तलावात रूपांतर
चिकनगुनिया : बचावासाठी काय करायला हवे, हे जाणून घ्या

जोडप्याने कवटाळले मृत्यूला

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घराच्या मातीच्या भिंती जरजर झाल्या होत्या. अशात बुधवारी रात्री धो-धो आलेल्या पावसाने यात भर घातली. घरात झोपलेले मध्यमवर्गीय जोडपे रामकृष्ण महादेव चौधरी (४५) आणि पत्नी ज्योती रामकृष्ण चौधरी (३८) यांच्या अंगावर भिंती कोसळल्या जागीच मृत्यू झाला. तर मुलगा आदित्य चौधरी (१५) हा गंभीर जखमी झाला असून, रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शेतात पाणीच पाणी

लोअर वर्धा धरणाला थोप बसल्यामुळे आड नद असो, बाकली नद असो अथवा परिसरातील नदी नाले आदींच्या काठावर असलेल्या शेतात पाणी शिरले आणि शेताने तलावाचे रूप कधी धारण केले कळलेच नाही. यात निंबोली (शेंडे), एकलारा, नांदपुर, लाडेगाव, शिरपुर, जळगाव, देऊरवाडा, सर्कसपूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेती जलमय झाल्या आहे. पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

निम्न व उर्ध्व वर्धा धरण ठरतेय धोक्याचे

धरणात वाहून येणारा पाणी, साठवण क्षमता व थोप बसल्यानंतर मागे सरणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून व्यापल्या जाणारा परिसर याचा तांत्रिकदृष्ट्य़ा अभ्यास न करताच निर्माण केलेले निम्न व उर्ध्व वर्धा धरण तालुक्यातील आर्वी शहर व नदी काठावरील सुमारे २० गावांसाठी धोकादायक ठरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याला भविष्याची नांदी समजून काही अप्रिय घटना घडण्या अगोदरच प्रकल्प विभागाने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com