esakal | चिकनगुनिया : बचावासाठी काय करायला हवे, हे जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

चिकनगुनिया : बचावासाठी काय करायला हवे, हे जाणून घ्या

चिकनगुनिया : बचावासाठी काय करायला हवे, हे जाणून घ्या

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : चिकनगुनिया या आजाराचे नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. कारण, चिकनगुनिया झाल्यावर त्याचा त्रास एक ते दोन वर्ष होतो असे म्हणतात. चिकनगुनियामध्ये अंगदुखी आणि भयंकर तापामुळे माणूस हैराण होतो. चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असला तरी तो संसर्गजन्य नक्कीच नाही. या आजारापासून सुटका हवी असेल तर न घाबरता याचा सामना करायला हवा.

चिकनगुनियाची लक्षणे वेळीच ओळखता आणि योग्य उपचार घेतले तर यातून लवकर बरे होता येते. कोणत्याही आजाराला दूर ठेवायचे असेल किंवा आजारपणातून पूर्ण बरे व्हायचे असेल तर आजाराबद्दल सर्व माहिती असायला हवी. पावसाळ्यात चिकनगुनियाचा धोका वाढतो. ताप आणि सांधेदुखी या लक्षणांद्वारे या आजाराचे निदान होते. हा विकार डासांमुळे होतो. त्यापासून बचाव करण्यासाठी काय करायला हवे, हे आपण जाणून घेऊ या...

हेही वाचा: देशमुख यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी; नागपुरात हालचाली

चिकनगुनियाची लागण झाल्यानंतरच्या ४८ तासांमध्ये रुग्ण अस्वस्थ होतो. तीव्र ताप आणि सांधेदुखी ही प्राथमिक लक्षणे आहेत. शरीरावर पुरळ उठणे तसेच सांधे सुजणे ही चिकनगुनियाची अन्य लक्षणे आहेत. रक्तचाचणीद्वारे चिकनगुनियाचे निदान होतेच असे नाही. योग्य वेळी चाचणी केल्यास चिकनगुनियाचे निदान होऊ शकते.

या विकारावर फारशी औषधे उपलब्ध नाही. परंतु, हा विकार डोंगीप्रमाणे जीवघेणा नाही. लागण झाल्यानंतरच्या सहा महिन्यांनंतरही रुग्णांना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. चिकनगुनियापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. चिकनगुनिया प्रभावित भागांमध्ये जात असाल तर अंग झाकणारे कपडे घाला. म्हणजे डास चावू शकणार नाहीत. घर आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. बदाम तेल आणि कडुनिंबाचे तेल एकत्र करून अंगाला लावा. यामुळे डास आजूबाजूला फिरकणार नाही.

रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर

चिकनगुनियासाठी रक्ताची तपासणी आजाराच्या साधारणतः एक आठवड्यानंतर करतात. अँटिबॉडीचीही तपासणी चिकनगुनिया आहे की नाही हे सांगू शकते. ही तपासणी डॉक्टरांच्या निदानाला पूरक म्हणून करतात. इतर तापाच्या आजारांची शक्यता फेटाळून लावण्यासाठी डॉक्टर इतरही काही तपासण्या सांगू शकतात.

हेही वाचा: सुधीर मुनगंटीवारांची मुलाखत घेणारी स्वामीनी झाली डीआयजी!

भरपूर पाणी व पेये घ्या

चिकनगुनिया हा आपोआप बरा होणारा आजार आहे. या व्हायरसच्या विरोधात कुठलेही औषध सध्या तरी आपल्याकडे नाही. त्यामुळे उपचार हा लक्षणे कमी करण्यासाठी दिला जातो. दुखण्यासाठी व तापासाठी पॅरासीटामॉल व गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घावी. भरपूर पाणी व पेये घ्यावीत. ताप गेल्यावरही दुखणे सुरू राहिल्यास डॉक्टरांकडे जा.

डासांचा नायनाट करणे हे प्राधान्य

रक्तदाब, डायबेटिस, किडणीचे आजार किंवा हृदयविकार यासारखे काही आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज असते. डास हा आपला राष्ट्रीय शत्रू आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा जास्त नुकसान डास करतात. त्यामुळे डासांचा नायनाट करणे हे प्राधान्य आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्या घरातील व परिसरातील डासांचा नायनाट करणे गरजेचे आहे. डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी, हातपाय झाकणारे कपडे, डास दूर ठेवणाऱ्या क्रीम आदींचा वापर करा.

हेही वाचा: पाठदुखी : जाणून घ्या पाठ न सोडण्याचे कारण अन् उपाय

लक्षणे

 • ताप, तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकनगुनियाची लक्षणे आहेत

 • रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात

 • रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो

 • काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात

 • स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणे

 • अचानक ताप येणे

 • सांधेदुखी

 • डोकेदुखी

 • स्नायूंमध्ये वेदना

 • पुरळ

 • सांध्यांना सूज येणे

 • आर्थ्राटीस

 • उलटी आणि मळमळ

हेही वाचा: ‘लग्न कर किंवा तीन लाख दे’, स्क्रीन शॉट केले व्हायरल

घरगुती उपाय

 • भरपूर पाणी प्या

 • दुधाचे पदार्थ खा

 • ओवा खा

 • हळदीचे दूध प्या

 • पपईच्या कोवळ्या पानांचा रस

 • लसणाचे करा सेव

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top