
चिखलदरा (जि. अमरावती) : एकीकडे निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या समुद्र भागाला जोरदार तडाखा दिला असताना विदर्भातही त्याचा परिणाम जाणवतोय. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असून, संपूर्ण मेळघाटाने धुक्याची चादर पांघरली आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळी आज पावसाने दमदार हजेरी लावली. वातावरणात झालेल्या बदलामुळे संपूर्ण मेळघाटाने धुक्याची चादर पांघरली. चिखलदऱ्यात रात्रीपासून भुरभुर पावसाला सुरुवात झाली. दरवर्षी पावसाला सुरुवात होताच पर्यटकांची पावले चिखलदऱ्याकडे वळतात.
मागील वर्षी झालेला मुबलक पाऊस आणि यंदाही अगदी वेळेत वरुणराजा बरसल्याने निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. परंतु कोरोना महामारीमुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह चिखलदरा पर्यटन केंद्रास येण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येथे सर्वत्र शुकशुकाट आहे.
पावसाचे वातावरणात गारवा पसरला असून, चिखलदऱ्याचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना खुणावत आहे. येथील व्यावसायिक, हॉटेलमालक आणि इतरही विक्रेते पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्यातरी येथे पर्यटक येण्याची शक्यता दिसत नाही. मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आता शेतीच्या माध्यमाने आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.