
Heavy Rain
sakal
अंबाडा : नरखेड तालुक्यातील आरंभी, हिवरमठ, मेंढला वाढोना, खराळा या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी, भाजीपाला यासारखी पिके उध्वस्त झाली असून शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे.