
रिसोड : जिल्ह्यातील बऱ्याचशा भागात पावसाअभावी खरिपाची पेरणी थांबली होती. ता. २५ च्या सायंकाळी सात वाजतापासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू झाली आणि आज ता.२६ जून रोजी तालुक्यातील कांचन नदी, उतावळी नदी या नद्यांना पूर आल्याने मालेगाव मेहकर राज्य मार्ग क्रमांक २२ हा पूर्णतः बंद झाला आहे.