
शेतातून येणाऱ्या उत्पन्नातून मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्य तसेच सुख-दु:खाच्या काळाचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. मात्र, शेतकऱ्यांच्या या स्वप्नावर अतिवृष्टीने पाणी फेरले गेले. गेल्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस, नदी, नाल्यांना आलेल्या पुरात कापूस, तूर, सोयाबीन आणि प्रामुख्याने उस उत्पादक शेतकरी गारद झाले.