
Vidarbha Heavy Rain
sakal
नागपूर : यंदा विदर्भासह सगळीकडे दमदार हजेरी लावणारा मॉन्सून सध्या परतीच्या मार्गावर आहे. हवामान विभागाने मंगळवारी पावसाचा विदर्भात अर्लट दिला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरवत सोमवारी (ता.१५) रोजी नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, वाशीममध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातले. काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. रस्त्यांवर पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल झाले.