मोबाईलच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नंदनवन ः दुकानातून मोबाईल फायनान्स करणाऱ्या मोबाईल विक्रेत्याने 17 वर्षीय तरुणीवर घरात घुसून बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी दुकानदारावर गुन्हा दाखल केला. दीपक चिरकुटराव बारंगे (वय 30, रा. साईबाबानगर, खरबी) असे आरोपी मोबाईल दुकानदाराचे नाव आहे.

नंदनवन ः दुकानातून मोबाईल फायनान्स करणाऱ्या मोबाईल विक्रेत्याने 17 वर्षीय तरुणीवर घरात घुसून बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी दुकानदारावर गुन्हा दाखल केला. दीपक चिरकुटराव बारंगे (वय 30, रा. साईबाबानगर, खरबी) असे आरोपी मोबाईल दुकानदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बारंगे याची नंदनवन हद्दीत मोबाईलची मोठी शॉपी आहे. येथून वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांची सेवा दिली जाते. फेब्रुवारी 2019 ला न्यू सहकार नगरात राहणारी पीडित तरुणी दीपकच्या मोबाईल शॉपीत गेली. तिने महागडा मोबाईल विकत घेतला. दरम्यान, दर महिन्याला मोबाईलची किस्त भरण्यासाठी जात असताना दीपक आणि तरुणीची मैत्री झाली. दोघांचे व्हॉट्‌सऍपवरून चॅटिंग सुरू झाले. दोघांच्या भेटी सुरू झाल्या. दरम्यान, दीपकने तिच्या मोबाईलच्या उर्वरित किस्तही माफ केल्या. दीपकने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला फिरायला नेणे किंवा चित्रपट बघायला जाण्यासाठी आग्रह करीत होता. मे महिन्यात घरी कुणीही नसताना तिच्या घरी दीपक आला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तरुणीने नकार दिला. मात्र, त्याने लग्न करण्याची तयारी दर्शविली. शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्याने आईवडिलांशी भेट घालून देण्याचे आश्‍वासन तिला दिले. परंतु, तो भेट घालून देण्यास टाळाटाळ करीत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपकने तिच्या घरी जाऊन लग्न करण्यास असमर्थता दर्शविली आणि निघून गेला. त्याच्या अशा वागण्यामुळे ती गोंधळात पडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने नंदनवन पोलिस ठाण्यात लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या दीपकचा पोलिस शोध घेत आहेत.

प्रियकर निघाला विवाहित
दीपक बारंगे याने लग्नास अचानक नकार दिल्यामुळे तरुणीने त्याची कौटुंबिक माहिती काढली. दीपक हा विवाहित असून त्याला दोन मुलेसुद्धा आहेत, अशी माहिती तिला मिळाली. परंतु, दीपकने अविवाहित असल्याचे सांगून लग्न करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे तिने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास होकार दिला होता. त्याला धडा शिकविण्यासाठी बलात्काराची तक्रार तरुणीने पोलिसांत केल्याची माहिती आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of mobile Raping young girl