ब्रेकिंग : यशोमती ठाकूर यांना हायकोर्टाचा दिलासा; तीन महिन्यांच्या शिक्षेला दिली स्थगिती

टीम ई सकाळ
Thursday, 22 October 2020

आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा झाली होती. याविरुद्ध यशोमती ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावर निर्णय घेताना उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. अमरावती न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

नागपूर : पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला होता. याविरुद्ध यशोमती ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावर निर्णय घेताना उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. तसेच पोलिसांना नोटीस बजावली आहे.

ठाकरे सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या यशोमती ठाकूर यांना १५ ऑक्टोबरला तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा झाली होती. याविरुद्ध यशोमती ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावर निर्णय घेताना उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. अमरावती न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या प्रकरणी आम्ही निर्दोष आहोत. त्यामुळे न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले होते.

रस्त्यावरच रौराळे यांना थापड मारल्याचा आरोप

अमरावतीच्या अंबादेवी मंदिराजवळ पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात अमरावती न्यायालयाने ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. सन २०१२ ची ही घटना आहे. वाहतूक पोलिस कर्मचारी रौराळे यांनी तेव्हाच्या आमदार आणि विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना गाडी पुढे नेण्यास मज्जाव केला होता. त्यांचा वाहनचालक आणि कार्यकर्त्यांची पोलिस कर्मचाऱ्यासोबत बाचाबाचीही झाली होती. दरम्यान ॲड. ठाकूर यांनी गाडीतून उतरून रस्त्यावरच रौराळे यांना थापड मारली होती.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Court consoles Yashomati Thakur