दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला तात्पुरता जामीन मंजूर

deepali chauhan suicide
deepali chauhan suicide e sakal

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी (deepali chavan suicide) जबाबदार म्हणून प्रकल्प संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रामासुब्बा रेड्डीने (srinivasa reddy) मुंबई उच्च न्यायालयाच्या (mumbai high court) नागपूर खंडपीठामध्ये (nagpur bench) धाव घेतली आहे. त्याच्यावर दाखल गुन्हा रद्द करावा आणि त्याला जामीन मिळावा या विनंतीसह त्याने याचिका दाखल केली होती. अखेर आज न्यायालयाने त्याला तात्पुरता जमीन (interim bail) मंजूर केला आहे. (high court gives interim bail to the srinivasa reddy in deepali chavan suicide case)

deepali chauhan suicide
भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप

या प्रकरणावर आज न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या समक्ष सुनावणी झाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्यानंतर रेड्डी यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली होती. याच प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे रेड्डी यांचं अखेर निलंबन करण्यात आलं होतं. अखेर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

कनिष्ठ न्यायालयाने शनिवारी (ता. १) पुढील चौदा दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. धारणी पोलिसाच्या मार्गदर्शनात रेड्डींना विशेष पथकाच्या देखरेखेत अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात स्वाधीन करण्यात आले असून रेड्डींना अमरावतीच्या स्थानिक अंध विद्यालयात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या खुल्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. तर, तपास सुरु ठेवत उच्च न्यायालयाच्या परवानगी शिवाय दोषारोपपत्र दाखल करू नये, असे न्यायालयाने नमूद केले. रेड्डीतर्फे अ‌ॅड. ए. ए. नाईक यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com