नागपूर ग्रामीणमध्ये अ‌ॅट्रॉसिटीचे सर्वाधिक गुन्हे, तर गडचिरोलीत सर्वात कमी

crime
crimee sakal

नागपूर : पूर्व विदर्भात अ‌ॅट्रॉसिटीचे गुन्हे (crime of atrocity) दाखल होण्याच्या प्रमाणात सर्वाधिक गुन्हे नागपूर ग्रामीण (highest crime in nagpur rural) नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये १४७ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. नागपूर शहरात त्याचे प्रमाण ११३ इतके असून दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूरमध्ये (chandrapur) १४३ गुन्हे नोंदविण्यात आले. गोंदियामध्ये (gondia) १०६ गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, गडचिरोलीमध्ये सर्वात कमी ६१ गुन्ह्यांची (lowest crime in gadchiroli) नोंद करण्यात आली. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागरी हक्क संरक्षण, नागपूर परिक्षेत्र पोलिस कार्यालयाकडे विचारणा केली होती. (highest crime of atrocities in nagpur rural)

crime
फक्त एका वर्षात पिणाऱ्यांनी दारूत ओतले तब्बल ५०८ कोटी

नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात गेल्या २८ महिन्यांत 'अॅट्रॉसिटी' अंतर्गत ४६७ गुन्हे दाखल करण्यात आले. मागील काही वर्षांच्या तुलनेत दाखल गुन्ह्यांची संख्या काहीशी घटली आहे. दरम्यान, शिक्षा मिळणाऱ्यांच्या तुलनेत निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. १ जानेवारी २०१९ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत 'अॅट्रॉसिटी' अंतर्गत ७६७ गुन्हे दाखल झाले. या कालावधीत ११० खटले न्यायालयात दाखल झाले. २८ महिन्यांत जुन्या तसेच तत्कालीन दाखल खटल्यांवर सुनावणी झाली. यात नऊ जणांना शिक्षा करण्यात आली तर १५१ जणांची मुक्तता झाली. यात अगोदरच्या खटल्यांचादेखील समावेश होता. ‘अॅट्रॉसिटी'अंतर्गत सर्वात जास्त ३४३ गुन्हे २०१९ साली नोंदविण्यात आले .

अॅट्रॉसिटी गुन्हे

वर्ष दाखल गुन्हे दाखल खटले

  • २०१९ ३४३ ३०९

  • २०२० ३३८ ३१०

  • २०२१ ८६ ९१ (१ जाने ते ३० एप्रिल २०२१)

वर्ष सुटका झालेले शिक्षा मिळालेले

  • २०१९ ९९ ३

  • २०२० ३४ १

  • २०२१ १८ ५ (१ जाने ते ३० एप्रिल २०२१)

एकूण दाखल गुन्हे

  • नागपूर शहर - ११३

  • नागपूर ग्रामीण - १४७

  • भंडारा -८९

  • गोंदिया - १०६

  • वर्धा - १०५

  • चंद्रपूर - १४३

  • गडचिरोली - ६१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com