फक्त एका वर्षात पिणाऱ्यांनी दारूत ओतले तब्बल ५०८ कोटी

फक्त एका वर्षात पिणाऱ्यांनी दारूत ओतले तब्बल ५०८ कोटी

नागपूर : लॉकडाउनमुळे (lockdown) अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. परंतु, दारू (Alcohol) पिणाऱ्यांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसत नाही. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ५०८ कोटी पिणाऱ्यांनी खर्च (508 crore expenditure) केले. सर्वाधिक देशी तर त्यापाठोपाठ विदेशी दारूची विक्री आहे. पिणाऱ्यांनी २ कोटी ६२ लाख लीटर देशी तर १ कोटी २२ लाख लीटर विदेश दारू रिचवली. (Drunkards drink Rs 508 crore liquor the year)

राज्य शासनाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या विभागात उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे सरकारच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले. परंतु, दारूविक्रीस ऑनलाइन परवानगी दिली. गेल्या वर्षी लॉकडाउन करते वेळी दारू दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. मे २०२० ला ऑनलाइन विक्रीस परवानगी देण्यात आली. त्यानंतर ती ऑफलाइन म्हणजे दुकानातून विक्रीस परवानगी देण्यात आली.

फक्त एका वर्षात पिणाऱ्यांनी दारूत ओतले तब्बल ५०८ कोटी
चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

१ एप्रिल ते ३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये नागपूर जिल्ह्यात २ कोटी ६२ लाख ३२ हजार ८३१ लीटर देशी दारूची विक्री झाली. तर १ कोटी २२ लाख ८६ हजार ४०८ लीटर विदेश दारूची विक्री झाली. ६१ लाख ७१ हजार ४७३ लीटर बिअर व १ लाख ६५ हजार ११७ लीटर वाइनचा खप झाला. यातून राज्याला ५०८ कोटींचा महसूल मिळाला. सर्वाधिक विक्री मार्च २०२१ मध्ये झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात देशी दारूची विक्री ५५ टक्के तर विदेशी दारूची विक्री ३० टक्के अधिक झाली. एकूणच मागील वर्षीच्या तुलनेत देशीची विक्री १३ तर विदेशी दारूची विक्री ७ टक्के कमी असल्याचे सांगण्यात येते.

२,४४४ आरोपींना अटक

वर्ष २०२०-२१ मध्ये अवैध दारू विक्री व वाहतूक प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने २,९३३ गुन्हे दाखल केले. यात २ हजार ४४४ आरोपींना अटक केली. तर त्यांच्याकडून ४ कोटी ४२ लाख ३२ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

(Drunkards drink Rs 508 crore liquor the year)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com