लॉकडाउनमध्येही अचलपुरात लग्नसोहळे जोमात, तब्बल 311 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

highst numbers of marriage recorded in achalpur taluka of amravati district
highst numbers of marriage recorded in achalpur taluka of amravati district
Updated on

अचलपूर (जि. अमरावती) : लॉकडाउनच्या काळात अचलपूर तालुक्‍यात 2 जूनपर्यंत जवळपास 191 दिलवाले आपल्या नववधूला जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर घेऊन गेले. तर सहा नववधू इतर राज्यातही गेल्या. त्याचबरोबर 114 नववधू अचलपूर तालुक्‍यात आल्या व लॉकडाउनच्या काळात लग्नाच्या गाठीत बांधल्या गेल्या.

तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेल्या लग्नाच्या परवानगीच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होत आहे. तालुक्‍यातील बहुतेक गावांत चोरी-चोरी चुपके-चुपके लग्न झाल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, कोरोनाने या विपरीत परिस्थितीत कसे जुळवून घ्यावे हे शिकविल्याचे बोलल्या जात आहे. शेतकरी कर्जाचे ओझे सोसत, दु:ख सहन करीत मुलामुलींच्या लग्नाची हौस भागवीत असे. पण आज कोरोनाच्या संकटामुळे ना डोक्‍यावर कर्जाचा भार, ना जास्त तामझाम, अगदी कमी लोकांत, कमी खर्चातही छान लग्न पार पडत आहेत. त्यामुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंब आनंदित आहेत.

सध्या कोरोनाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. परिणामी लॉकडाउन वाढतच आहे. लॉकडाउनमुळे किती दिवस लग्न रोखून धरायचं? म्हणून गावागावांत सावधान राहून लग्नविधी उरकले जात आहेत. ग्रामीण भागातील लग्न बहुधा मार्च ते जूनपर्यंत चालतात. पण मार्च महिन्यातच कोरोना विषाणू येऊन धडकला आणि तो थांबता थांबेना, त्यामुळे कोरोना येण्यापूर्वी दोन परिवारातील नात्यांना एकत्र करण्यासाठी लग्नगाठ बांधायची तयारी करून झाल्याने त्या दोन जिवांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी पुढे पाऊल उचलले जात आहे. नियम व अटी ठेवून प्रशासन लग्नकार्य करण्याची परवानगी देत आहे. यामध्ये बहुतेक लग्नघरची मंडळी प्रशासनाच्या अटींचे पालन करून सामान्यपणे लग्नविधी उरकून घेत आहे.

कोरोनाच्या तापाचा परिणाम लग्नकार्यावर झाला आहे. आत्याच्या, भावाच्या लग्नाला यायचं हं.... असं नातेवाइकांना आवर्जून सांगणारे आप्त आता आम्ही आमचे उरकून घेतो, तुम्ही लग्नाला येऊ नका. असा आग्रह करीत आहेत. लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसवे- फुगवे कोरोनाने हिसकावून घेतले आहेत. इच्छा असूनही आप्तेष्टांना दूर ठेवावे लागत आहे, आप्तांची दिलगिरी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आप्तही अडचण समजून घेत आहेत. त्यामुळे मानपानाचा सोपस्कार विसरून आप्त फेसबुक, व्हॉट्‌सऍप आदी माध्यमातून आशीर्वाद देऊ लागली आहेत. फार तर पंचवीस - पन्नास लोकांमध्ये लग्नकार्य आटोपून घेत आहेत. कोरोनाच्या संकटात या सर्व बाबींना सोईस्करपणे फाटा दिला जात आहे. हे सर्व बदल कोरोनाने घडविले आहेत. त्यामुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंब आनंदित दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com